Thursday, July 31, 2025
Homeक्रीडाब्रेकींग: टी-20 वर्ल्डकपबाबत मोठी बातमी, ‘या’ संघाची सेमिफायनलमध्ये एंट्री

ब्रेकींग: टी-20 वर्ल्डकपबाबत मोठी बातमी, ‘या’ संघाची सेमिफायनलमध्ये एंट्री

T20 World Cup 2022 मध्ये आज न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यामध्ये महत्वाचा सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने शानदार विजय मिळवला असून आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटिलनं हॅट्रिक घेतल्याने तो टी-20 विश्वचषकात असा विक्रम करणारा सहावा गोलंदाज ठरला आहे.

एवढंच नव्हे तर यंदाच्या विश्वचषकात पावसाच्या व्यत्ययामुळे अनेक संघांना गुणांमध्ये फटका बसला असून आजच्या सामन्यात झालेल्या विजयामुळे न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. यंदाच्या स्पर्धेत न्यूझीलंड सेमिफायनल मध्ये पोहोचणारा पहिलाच संघ आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचे गुण बरोबरीत होते.

आजच्या सामन्यात न्यूझीलंडने आयर्लंडसमोर 186 धावांचे लक्ष्य ठेवले असता आयर्लंडने कडवी झुंज देत 150 धावापर्यंतच मजल मारली. त्यामुळे न्यूझीलंडने 35 धावांनी विजय मिळवून सेमिफायनल मध्ये एंट्री केली.

न्यूझीलंडकडून केन विलियम्सनने 61 धावा, फिनने 32 धावा तर मिशेलने नाबाद 31 धावा केल्या. तर आयर्लंडकडून दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत सलामीवीर पॉल स्टर्लिंग 27 चेंडूत 37 आणि कर्णधार अँड्र्यू बालबिर्नी यांनी 25 चेंडूत 30 धावा केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -