Tuesday, July 29, 2025
Homeयोजनानोकरीमहत्वाची बातमी ! आजपासून अग्निवीर वायु 2023 साठी ऑनलाइन नोंदणी आजपासून सुरू...

महत्वाची बातमी ! आजपासून अग्निवीर वायु 2023 साठी ऑनलाइन नोंदणी आजपासून सुरू होणार

जर तुम्ही अग्निवीर वायुसाठी अर्ज करण्याच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर वायु 2023 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 7 नोव्हेंबरपासून सायंकाळी 5 वाजता सुरू होईल.

इच्छुक उमेदवार आज संध्याकाळी 5:00 नंतर अग्निवीर वायुच्या अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नोंदणीकृत उमेदवार अर्ज भरू शकतात.

वयोमर्यादा

27 जानेवारी 2002 ते 27 डिसेंबर 2005 दरम्यान जन्मतारीख असलेले सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात.

शैक्षणिक पात्रता

ज्या विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट (12वी) मध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजीमध्ये किमान 50% गुण मिळवले आहेत किंवा 3 वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा एकूण 50% आणि इंग्रजीमध्ये 50% गुण मिळवलेले आहेत ते अर्ज भरू शकतात.

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  1. अग्निपथ भर्ती 2023 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. होम पेजवर, अग्निवीर वायु 2023 नोंदणी वर ा.
  3. त्यानंतर तुमचे पूर्ण नाव, ईमेल, जन्मतारीख आणि इतर तपशील भरून डॉक्युमेंट अपलोड करा.
  4. अर्ज फी जमा केल्यानंतर सबमिट बटणावर ा.
  5. अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर, त्याची प्रत काढा.

अधिसूचनेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, अग्निवीर वायु पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे. अर्ज 23 नोव्हेंबर 2022 संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत सादर केले जातील. फॉर्म भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर दुरूस्तीची संधी दिली जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -