Thursday, August 7, 2025
Homeराजकीय घडामोडीउद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, ऑपरेशन युवा सेना,14 पदाधिकारी आज शिंदे गटात!

उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, ऑपरेशन युवा सेना,14 पदाधिकारी आज शिंदे गटात!

पूर्व विदर्भात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे गटाने येथील ठाकरे गट फोडला आहे. या भागातील युवासेनेचे सात जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी आज बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किरण पांडव यांनी लावला आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाईंच्या युवा सेनेला सुरुंग लावण्याचं काम केलंय.

पूर्व विदर्भातील म्हणजेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचीरोली जिल्ह्यातील युवा सेनेला मोठा धक्का या घटनेनं मोठा हादरा बसला आहे. विदर्भातील महत्त्वाचे तरुण कार्यकर्ते यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे राहतील. पूर्व विदर्भात खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात किरण पांडव यांनी ‘ॲापरेशन युवा सेना’राबवलं आहे. यात त्यांना मोठं यश आलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत लवकरच सर्वजण शिंदे गटाच प्रवेश करणार आहेत. हर्षल शिंदे, शुभम नवले, रोशन कळंबे, दिपक भारसागडे, कगेश राव, नेहा भोकरे, सोनाली वैद्य हे युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिंदे गटात जाणार आहेत. आज सर्व पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

विदर्भातील कोण-कोण पदाधिकारी फुटले?

1) हर्षल शिंदे
युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर
2) शुभम नवले
युवासेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण
3) रोशन कळंबे
युवासेना जिल्हाप्रमुख भंडारा
4) दीपक भारसाखरे गडचिरोली
युवासेना जिल्हाप्रमुख
5) कगेश राव गोंदिया
युवासेना जिल्हाप्रमुख

6) नेहा भोकरे
युवतीसेना जिल्हाप्रमुख नागपूर
7) सोनाली वैद्य
युवतीसेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण
8) प्रफुल सरवान
जिल्हा समन्वयक नगरसेवक भद्रावती चंद्रपूर जिल्हा
9) राज तांडेकर
जिल्हा समन्वयक नागपूर
10) लखन यादव
जिल्हा समन्वयक रामटेक
11) कानाजी जोगराणा
जिल्हा चिटणीस नागपूर
12) अभिषेक गिरी
उप-जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण
13) सुनील यादव
रामटेक विधानसभा समन्व्यक
१४) ऋषभ विनोद मिश्रा
गोंदिया युवा सेना जिल्हा प्रमुख

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -