महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात अपघातात तीन विद्यार्थ्यांसहित चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. परिक्षा देऊन तीन विद्यार्थी एका रिक्षातून परतत होते.येत असताना रिक्षावर रेतीने भरलेला डंपर पलटल्याने रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
अधिक माहितीनुसार, रिक्षात असलेली तीन विद्यार्थी परिक्षा देऊन परतत असताना त्यांच्या रिक्षावर रेतीने भरलेला डंपर पलटी झाला. त्यामध्ये रिक्षाचा चुराडा झाला असून रिक्षाचालकासह तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केलाय.
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपये मदतीची घोषणा केली आहे. याबद्दलची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तर या घटनेनंतर अधिकचा तपास चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.