बॉलिवूड इंडस्ट्रीतील चार सुपरस्टार सनी देओल, संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती आणि जॅकी श्रॉफ एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. त्यांच्या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. निर्मात्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. 80 आणि 90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणारे हे कलाकार या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
सनी देओलने शेअर केला चित्रपटाचा फर्स्ट लूक
चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना सनी देओलने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘#BaapOfAllFilms शूट धमाल, मैत्री.’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये चार दिग्गज स्टार्स एकत्र पोज देताना दिसत आहेत. या पोस्टरमध्ये चौघांचा लूक अप्रतिम दिसत आहे. विवेक चौहान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. अहमद खान, शायरा अहमद खान आणि झी स्टुडिओज यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे.
लूकबद्दल बोलायचे तर मिथुन चक्रवर्ती यांनी हाफ स्लीव्ह लेदर जॅकेट घातले आहे. त्यांनी टोपी घातली असून कपाळावर टिळा लावला आहे. सनी देओलच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तो ऑरेंज जेल युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. तिसरा लूक संजय दत्तचा आहे, जो सनीच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसतोय. ब्राऊन जॅकेट आणि ब्लॅक प्लेन टी-शर्ट आणि जीन्समध्ये त्याचा इंटेन्स लूक दिसत होता. चौथा आणि शेवटचा लूक जॅकी श्रॉफ यांचा आहे. त्यांनी खाकी प्रिंट जॅकेट आणि लेदर शूज घातले आहेत.
फर्स्ट लूक पाहिल्यानंतर चाहते झाले एक्साइटेड
आपल्या आवडत्या स्टार्सला एकत्र पाहून चाहते खूप खूश आहेत. सनी देओलच्या पोस्टवर लोक कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘बाप हा बाप असतो.’ आणखी एका चाहत्याने, ‘बर्याच वर्षांनी सर्वजण एकत्र येत आहेत’ अशी प्रतिक्रिया दिली. जॅकी श्रॉफ आणि सनी देओलने यावर्षी जून महिन्यात एक फोटो शेअर करून या चित्रपटाबद्दल माहिती दिली होती. ज्यामध्ये जॅकी, मिथुन आणि संजय दत्त एकत्र दिसले होते. जॅकी यांनी लिहिले होते, ‘जिथे चार मित्र भेटतात, अरे चौथा कुठे आहे बिडू.’ आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.