Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीमिरजेतील युवा सराफाचा गोव्यात अकस्मात मृत्यू;तरुण व्यावसायिकाच्या  अचानक मृत्युमुळे शहरात उडाली खळबळ

मिरजेतील युवा सराफाचा गोव्यात अकस्मात मृत्यू;तरुण व्यावसायिकाच्या  अचानक मृत्युमुळे शहरात उडाली खळबळ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मिरजेतील सराफ व्यावसायिक समर्थ संजय शिखरे (वय 31 ) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी रात्री गोव्यात अकस्मात मृत्यू झाला. समर्थ शिखरे चार उद्योजक मित्रांसोबत गोव्यात पर्यटनासाठी गेले होते. गोव्यातील पणजी येथे लाॅजवर ते मुक्कामास होते. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता समर्थ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.



त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच शिखरे यांच्या मित्रांनी गोव्यात धाव घेतली. मंगळवारी मिरज सराफ बाजार बंद ठेवून शिखरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समर्थ शिखरे यांच्या पश्चात आई वडिल भाऊ असा परिवार आहे. तरुण व्यावसायिकाच्या गोव्यात अचानक मृत्युमुळे शहरात खळबळ उडाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -