Sunday, February 22, 2026
Homeक्रीडामुंबई, चेन्नई संघांनी स्टार खेळाडूंना दिला नारळ, पोलार्ड, रवींद्र जाडेजाबाबत मोठा निर्णय..

मुंबई, चेन्नई संघांनी स्टार खेळाडूंना दिला नारळ, पोलार्ड, रवींद्र जाडेजाबाबत मोठा निर्णय..

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर क्रिकेट चाहते टीम इंडियावर चांगलेच भडकले आहेत. अशातच ‘आयपीएल’बाबत मोठी बातमी समोर आली आहे.

इंडियन प्रीमियर लिगच्या 16 व्या हंगामासाठी संघ व्यवस्थापन आतापासूनच कामाला लागले आहे. या 16 व्या मोसमासाठी येत्या 23 डिसेंबरला कोचीत खेळाडूंचे ‘मिनी ऑक्शन’ होणार आहे. त्याआधी ‘बीसीसीआय’ने प्रत्येक फ्रँचायजीला रिटेन केलेल्या व रिलीज खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत देण्यास सांगितलं आहे.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांनी ‘बीसीसीआयला’ रिलीज व रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाठवली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही संघांनी अनेक दिग्गज खेळाडूंना यंदा नारळ दिल्याचे दिसत आहे.

मुंबईचा पोलार्डला राम राम..

‘आयपीएल’च्या अगदी पहिल्या हंगामापासून मुंबई इंडियन्ससोबत असणारा एकमेव खेळाडू म्हणजे किरॉन पोलार्ड.. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वेस्ट इंडिजच्या या धाकड खेळाडूच्या बॅटमधून धावा निघणं बंद झालंय. वेस्ट इंडिजने टी-20 वर्ल्ड कपसाठीही संघात त्याची निवड केली नव्हती. त्यानंतर आता मुंबईनेही त्याला राम राम केलंय..

मुंबईने एकूण 10 खेळाडूंना रिटेन केलं, तर 5 जणांना रिलीज केलंय. त्यात कॅप्टन रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स व टिळक वर्मा यांना मुंबईने कायम ठेवलं आहे, तर पोलार्डसह फॅबियन एलेन, टायमल मिल्स, मयांक मार्कंडे व ऋतिक शौकीन यांना करारमुक्त केलंय.

चेन्नई संघात जाडेजा कायम

चेन्नई सुपर किंग्ज व अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा यांच्यातील वाद गेल्या वर्षी चांगलाच रंगला होता. चेन्नईने कॅप्टन केल्यावर जाडेजाच्या खेळावर परिणाम झाला, शिवाय संघालाही मनासारखी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे जाडेजा लवकरच चेन्नई संघाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, 16 व्या मोसमासाठी चेन्नईने जाडेजाला कायम ठेवलंय.

चेन्नईने 9 खेळाडूंना रिटेन केलं, तर 4 जणांना रिलीज केलं. त्यात महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जाडेजा, मोईन अली, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस व दीपक चाहर यांना रिटेन केलं असून, ख्रिस जॉर्डन, एडम मिल्ने, नारायण जगदीशन आणि मिचेल सेंटनेर यांना रिलीज केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -