Homeमहाराष्ट्रसंध्याकाळी ७ नंतर.! RBI चा बँकांना मोठा दणका; काय आहे नवा नियम?

संध्याकाळी ७ नंतर.! RBI चा बँकांना मोठा दणका; काय आहे नवा नियम?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्जवसुलीसंदर्भातील नियमांमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि कठोर बदल केले आहेत. जर तुम्ही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे कर्ज घेतलेले असेल आणि त्याचे नियमित किंवा थकीत हप्ते भरत (Overdue installments) असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक आहे.

 

मध्यवर्ती बँकेच्या नवीन नियमांनुसार, आता कोणताही वसुली प्रतिनिधी (Recovery Agent) कर्जदाराला सकाळी ०८ वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी ०७ वाजेनंतर दूरध्वनी करू शकणार नाही किंवा त्यांच्या घरी जाऊन मानसिक त्रास देऊ शकणार नाही. या नियमांमुळे कर्जदारांना दिलासा मिळून वसुली प्रतिनिधींच्या अरेरावीला पूर्णपणे पायबंद बसणार आहे. (RBI)

 

नियमांचे उल्लंघन केल्यास बँकांवर होणार कारवाईनवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व बँका आणि गैर-बँकिंग वित्तीय संस्थांना (NBFC) या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे. निर्धारित वेळेव्यतिरिक्त इतर वेळी संपर्क साधणे, अनुचित भाषेत संवाद साधणे किंवा नातेवाईकांना त्रास देणे या गोष्टींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जर एखाद्या प्रतिनिधीने या नियमांचा भंग केला, तर संबंधित बँक आणि संस्थेला जबाबदार धरून त्यांच्यावर मध्यवर्ती बँकेकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच, कर्जदाराला त्रास झाल्यास त्याला तक्रार निवारण कक्षाकडे दाद मागण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -