Sunday, December 22, 2024
Homenewsभोंदू बाबाचा 27 वर्षीय महिलेवर बलात्कार

भोंदू बाबाचा 27 वर्षीय महिलेवर बलात्कार

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका भोंदूबाबान बनावट पूजा मांडून 27 वर्षीय पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. या भोंदूबाबान पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्यानं पीडितेला पूजेत नग्नावस्थेत बसवून तिच्यावर अत्याचार केला आहे. हि घटना उघडकीस येताच गंगापूर पोलिसांनी भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


आरोपी भोंदूबाबाचे नाव कामील हुलाम यासीन शेख असं आहे. हा भोंदूबाबा परप्रांतिय असून गंगापूर गावातील पठाडे गल्ली येथील पत्र्याच्या खोलीत राहतो. आरोपी भोंदूबाबा कामीलन आपले दोन साथीदार स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नाडिस आणि अशोक भुजबळ या दोन साथीदारांच्या मदतीनं पीडित महिलेवर अत्याचार केला आहे. आरोपी पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत मागील सहा ते सात महिन्यांपासून पीडितेवर बलात्कार करत होता. आरोपी साथीदार स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नाडिस आणि अशोक भूजबळ हे पीडित महिलेच्या पतीचे मित्र आहेत.


या दोघांनी पीडित महिलेशी संपर्क साधत पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवलं होतं. त्यानंतर पीडित महिलाही आरोपींच्या जाळ्यात अडकली. पैशांच्या लोभापोटी आरोपींनी सांगितलेले सर्व आघोरी कृत करायला सुरुवात केली. पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर पूजेत नग्नावस्थेत बसावं लागेल अशी अट संशयित आरोपींनी पीडित महिलेला घातली होती. यानंतर आरोपी भोंदूबाबाने स्वतः आपल्या हातानं पीडित महिलेचे कपडे काढून तिला नग्नावस्थेत पूजेला बसवलं. यानंतर आरोपी भोंदबाबानं पीडितेवर वारंवार अत्याचार केला आहे. हा सगळा प्रकार मागच्या सहा ते सात महिन्यांपासून सुरू होता. यानंतर पीडित महिलेने आरोपीविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -