भारतीय शेअर बाजारात काही जागतिक घडामोडींचा परिणाम म्हणून सेन्सेक्समध्ये घसरण दिसून येत आहे. आज सकाळी सेन्सेक्स 78.42 अंकांनी खाली आला तर निफ्टीमध्ये 10.45 अंकांची वाढ झाली आहे. यामुळे बाजाराची स्थिती अस्थिर आहे, असं दिसतं. याशिवाय अमेरिकन बाजारात शुक्रवारी तेजी दिसून आली होती.
सेन्सेक्स सध्या (ता. 14 नोव्हेंबर) आज सकाळी 10:09 वाजता 61,716 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला तर निफ्टी 18,350 च्या पातळीवर पोहोचला आहे.
आज कोणत्या शेअरमध्ये तेजी: पॉवरग्रिड, कोटक बँक, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, एनटीपीसी, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टीसीएस.
आज कोणते शेअर घसरले: सन फार्मा, रिलायन्स, एशियन पेंट, ॲक्सिस बँक, टायटन, नेसले इंडिया, एल अँड टी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, विप्रो, भारती एअरटेल, आयटीसी.
महिनाभरातच दुप्पट परतावा देणारे शेअर:
1) के अँड आर रेल इंजिनिअरिंग
2) अलस्टोन टेक्स्टाईल्स
3) गुजरात टूलरूम
4) वेल्टरमॅन इंटरनॅशनल
5) श्री पेसेट्रॉनिक्स
6) वेस्ट लीझर रिसॉर्ट्स
7) युरेका इंडस्ट्रीज
8) एसबीईसी सिस्टीम्स
9) युनिमोड ओव्हरसीज
10) गुजरात इन्व्हेस्टा लिमिटेड