Saturday, July 26, 2025
Homeसांगलीमिरज वाहतूक शाखेचे काम कौतुकास्पद ; वाहतूक नियमांच्या बाबतीत कठोर निर्णय..!

मिरज वाहतूक शाखेचे काम कौतुकास्पद ; वाहतूक नियमांच्या बाबतीत कठोर निर्णय..!

मिरज शहर हे कर्नाटक व महाराष्ट्र सीमा भागातील मोठे शहर आहे. कोल्हापूर- सोलापूर याचबरोबर कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात मिरजेत वाहनधारक येत असतात. वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेल्या मिरज शहरात विविध शहरातून रुग्ण येतात. सद्य परिस्थितीला मिरजेत रस्त्यांची पूर्णता खड्ड्यांनी चाळण झाल्याने वाहनधारकांना वाहन चालवत असताना त्रास सहन करावा लागत आहे.

याच रस्त्यावर धुळीचा विस्तारही मोठ्या प्रमाणात आहे.रस्त्यावरील धूळ ,ऊन – वारा- पाऊस याचा त्रास सहन करीत वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. याच वाहतूक शाखेच्या कर्तव्य कठोर भूमिकेचा प्रत्यय कर्नाटकातील एका न्यायमूर्ती यांना आला.एका न्यायालयाचे न्यायमूर्ती परिवारातील सदस्य हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने रुग्णाची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले.

स्टेशन चौकात वाहतूक कर्मचाऱ्यांनी या न्यायाधीशांची गाडी बाजूला घेण्यास सांगितले, त्यांना सीट बेल्ट बद्दल विचारणा केली. न्यायाधीशांच्या गाडीला कोणताही फलक किंवा गाडीवरती कोणतेही नामोल्लेख केलेला आढळून न आल्याने वाहतूक कर्मचाऱ्यांनी त्यांना सीट बेल्ट लावण्या संदर्भात सल्ला दिला आणि त्यांना जाऊ दिले.मिरज वाहतूक शाखेच्या कर्तव्य कठोर निर्णयावरती व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना योग्य तो सल्ला देणाऱ्या वाहतूक शाखेचे उत्कृष्ट कार्य न्यायाधीशांना दिसून आलं, न्यायाधीशांनी प्रतिक्रिया देताना वाहतूक शाखेबाबत समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -