Sunday, July 27, 2025
Homeसांगलीमिरजेतील बेडग रोड येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक...

मिरजेतील बेडग रोड येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना शहर पोलिसांकडून अटक ; सुमारे 65,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त

मिरज शहरातील बेडग रोड येथे गांजा विक्री करणाऱ्या दोघांना मिरज शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दुचाकीसह सुमारे 65 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल शहर पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मिरज शहरातील बेडग रोड येथील काच फॅक्टरी जवळ गांजा विक्री करण्यासाठी दोन इसम येत असल्याची गोपनीय माहिती मिरज शहर पोलिसांना मिळाली.

त्याच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला होता मोटार सायकल वरून आलेल्या दोघांकडे सदरचा गांजा असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेल्या प्लास्टिक पिशवीत सुमारे 980 ग्रॅम वजनाचा उग्र वासाचा गांजा मिळून आला.

याबाबत मिरज शहर पोलिसांनी रियाज महबूब सारवाण वय 39 वर्षे राहणार मंगल टॉकीज जवळ मिरज आणि नवाज सैफन जमादार वय 23 राहणार गणेश तलावाजवळ मिरज या दोघांना शहर पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल एम एच दहा डी एफ 26 11 या क्रमांकाची मोटरसायकल सुद्धा पोलिसांनी जप्त केली असून एकूण 65 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -