Friday, December 19, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : ‘हातकणंगले' मतदारसंघातील नगरपरिषदांसाठी 15 कोटींचा निधी

Kolhapur : ‘हातकणंगले’ मतदारसंघातील नगरपरिषदांसाठी 15 कोटींचा निधी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील मूलभूत सुविधा व विकास कामांसाठी राज्य सरकारकडून 15 कोटींचा निधी मिळाला आहे. जयसिंगपूर, वडगाव, मलकापूर, हुपरी, करुंदवाड, पन्हाळा, शिरोळ, इस्लामपूर आष्टा, शिराळा, आदी प्रमुख नगरपरिषदांचा समावेश आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करुन पाठपुरावा करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्टय़पूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. त्यानुसार या योजनेअंतर्गत राज्य सरकारने राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना निधी व विविध कामे मंजूर केली आहेत. यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कोल्हापूर जिह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी निधी मंजूर झाला आहे. यामध्ये हुपरीसाठी 1 कोटी 50 लाख, वडगावसाठी 1 कोटी, शिरोळसाठी 1 कोटी, कुरुंदवाडसाठी 1 कोटी, पन्हाळासाठी 50 लाख, मलकापूरसाठी 50 लाख, हातकणंगलेसाठी 1 कोटी 50 लाख, जयसिंगपूरसाठी 3 कोटी असे 10 कोटी रुपये निधी मिळाला आहे. तर सांगली जिह्यातील इस्लामपूरसाठी 3 कोटी रुपये, आष्टासाठी 1 कोटी, शिराळासाठी 1 कोटी असे विविध विकास कामांसाठी 5 कोटी रुपये इतका निधी मिळाला आहे, अशी माहिती या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -