Friday, November 22, 2024
Homeतंत्रज्ञानरिलायंस जिओची फाईव्ह जी सेवा या ठिकाणी सुरु

रिलायंस जिओची फाईव्ह जी सेवा या ठिकाणी सुरु

रिलायंस जिओ ने टू जी ते फाईव्ह जी सेवेचा विस्तार प्रचंड वेगाने केला आहे. बुधवारी पुण्यात जिओने १ जीबीपीएस स्पीडने अनलिमिटेड फाईव्ह जी डेटाची सुरवात केली आहे. पुणे युजर्सना १ गिगाबाईट प्रती सेकंद या वेगाने फाईव्ह जी सेवा मिळणार आहे. या शहरात विद्यार्थी संख्या मोठी आहे. शिवाय देशात पुणे हे माहिती तंत्रज्ञान हब म्हणून ओळखले जाते. शिवाय येथे ऑटोमोबिल आणि अन्य उत्पादन प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आहेत. बुधवारपासून सुरु झालेल्या या अनलिमीटेड डेटा सेवेत वेलकम ऑफर खाली पुण्यातील सर्व जिओ युजर्स अतिरिक्त खर्चाशिवाय अनलिमिटेड डेटा मिळवू शकणार आहेत.

पुण्यापूर्वी जिओने दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद, दिल्ली एनसीआर मध्ये ट्रू फाईव्ह जी सेवा सुरु केली आहे. या सेवेचा शुभारंभ राजस्थान मधील नाथद्वारा येथून केला गेला होता. त्यानंतर मुंबई, कोलकाता, वाराणसी, हैद्रवाद, चेन्नई, बंगलोर, नागपूर अश्या १२ शहरात ही सेवा सुरु झाली आहे. ग्राहकांनी वेलकम ऑफर नोंदणीला चांगला प्रतिसाद दिला असून ग्राहकांचा अनुभव आणि फीडबॅक ची मदत नेटवर्क तयार करण्यासाठी होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -