Friday, November 22, 2024
HomeबिजनेसTATA कंपनी मीठ-चहानंतर आता पाणी विकणार, Bisleri कंपनीला घेणार विकत!

TATA कंपनी मीठ-चहानंतर आता पाणी विकणार, Bisleri कंपनीला घेणार विकत!

टाटा कंपनी मीठ-चहानंतर लवकरच बाटलीबंद पाण्याची विक्री करणार आहे. टाटा ग्रुप देशातील प्रसिद्ध मिनिरल वॉटर विक्री करणारी कंपनी बिसलेरीला (Bisleri) विकत घेण्याच्या तयारीत आहे. याबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये करार (Tata Consumer -Bisleri Deal Updates) सुरु आहेत. आता बिसलेरी कंपनी लवकरच टाटाची होणार आहे. बिसलेरी कंपनीची विक्री करण्यात येणार असल्याने ही कंपनी खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक होत्या. टाटासोबतच रिलायन्स रिटेल, नेस्ले आणि डॅनोन या कंपन्याही बिसलेरीला खरेदी करण्याच्या शर्यतीत होत्या.

इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, टाटा ग्रुप देशातील प्रसिद्ध बाटलीबंद पाणी विकणारी कंपनी बिसलेरी विकत घेणार आहे. टाटा समूह बिसलेरी इंटरनॅशनलला त्यांची उपकंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) अंतर्गत 6,000-7,000 कोटी रुपयांना विकत घेणार आहे. या करारांतर्गत, बिसलेरीचे सध्याचे व्यवस्थापन दोन वर्षांसाठी कंपनीचे कामकाज पाहणार आहे.

प्रसिद्ध उद्योगपती रमेश चौहान यांनी गुरुवारी सांगितले की, ते त्यांचा पाण्याच्या व्यवसाय ‘बिसलेरी इंटरनॅशनल’ साठी खरेदीदार शोधत आहेत आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडसह अनेक कंपन्यांशी चर्चा करत आहेत. बिसलेरीची विक्री करणार असल्याने आम्ही अनेक खरेदीदारांशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले. हा व्यवसाय टाटा समूहाच्या कंपनीला विकत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी ‘आमची बोलणी सुरु आहेत पण याबद्दल आता बोलणे योग नाही.’, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, तीन दशकांपूर्वी उद्योगपती रमेश चौहान यांनी आपला शीतपेयांचा व्यवसाय अमेरिकन शीतपेय कंपनी कोका-कोलाला विकला. 1993 मध्ये त्यांनी आपले थम्स अप, गोल्ड स्पॉट, सिट्रा, माझा आणि लिम्का सारखे ब्रँड विकले होते. 2016 मध्ये चौहान यांनी सॉफ्ट ड्रिंक व्यवसायात पुन्हा प्रवेश केला परंतु त्यांच्या ‘बिस्लेरी पॉप’ उत्पादनाला फारसे यश मिळाले नाही. आता सध्या ते पाण्याच्या बाटलीचा ब्रँड बिसलेरी विकणार आहेत. रमेश चौहान 82 वर्षांचे झाले आहेत. त्यांची मुलगी जयंतीला या व्यवसायात रस नाही. त्यामुळे त्यांना आता हा व्यवसाय विकायचा असल्याची माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -