ताजी बातमी ऑनलाईन टीम
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गेल्या ४८ तासांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी ११ वाजता आलेल्या मेडिकल बुलेटीननुसार विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे अशी माहिती मिळत आहे.
‘विक्रम गोखले हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत आहेत व हातपाय हलवत आहेत. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट निघत असून त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे,’ अशी माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याटगिकर यांनी दिली आहे.