ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी 6 नोव्हेंबर रोजी चिमुकल्या परीचे आपल्या आयुष्यात स्वागत केले. आलिया आणि रणबीर यांना मुलगी झाल्यापासून दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. घरामध्ये चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे कपूर कुटुंबामध्ये आनंदाचे वातवरण आहे. त्याचसोबत आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांना देखील खूप आनंद झाला. ते सर्वांना आलिया-रणबीरच्या बाळाचे काय नाव ठेवले जाणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागली होती. अखेर आलिया आणि रणबीरच्या लिटिल एन्जलचे नाव ठेवण्यात आले आहे. आलिया-रणबीरने आपल्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे. हे नाव आजी नीतू कपूरच्या पसंतीने ठेवण्यात आले आहे.
आलिया भट आणि रणबीर कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या मुलीचे नाव जाहीर केले आहे. त्यासोबतच त्यांनी आपल्या लिटिल एन्जलच्या नावाचा अर्थ देखील सांगितला आहे. आलिया भटने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आलियाने पती रणबीर कपूर आणि तिची चिमुकली परीसोबतचा एकत्र फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पप्पा रणबीर आपल्या चिमुकलीला मांडीवर घेऊन तिच्या डोक्यावर हात फिरवताना दिसत आहे. या फोटोमध्ये राहाच्या नावाची जर्सी भिंतीवर असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत आलियाने आपल्या पोस्टला सुंदर कॅप्शन देखील लिहिले आहे.