Monday, February 24, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या २८ जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्सच्या २८ जणांवर गुन्हा दाखल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

उद्धव गोडसे
कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीसह अन्य कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकांसह २८ जणांवर आज, शुक्रवारी (दि. २५) शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
झाला.



कंपनीचा प्रमुख लोहितसिंग धर्मसिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली) याच्यासह सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील संशयितांचा यात समावेश आहे. संशयितांनी कोल्हापूर जिल्ह्यातील १६९ गुंतवणूकदारांची ४ कोटी ८९ लाख ७२ हजार ६४९ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी रोहित सुधीर ओतारी (वय २५, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली.

शाहूपुरी पोलिस आणि गुंतवणूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, ए.एस. ट्रेडर्स कंपनीने २०१७ पासून दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. सुरुवातीचे काही वर्ष ठरल्यानुसार परतावा दिला. मात्र ऑगस्ट २०२२ पासून गुंतवलेली मुद्दल आणि परतावा देणे बंद केले. कंपनीच्या कार्यालयांमध्ये वारंवार मागणी करूनही मुद्दल आणि परतावा मिळत नसल्याने आपली फसवणू झाल्याचे गुंतणूकदारांच्या लक्षात आले.


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -