Sunday, December 22, 2024
Homeजरा हटकेLove Marriage Upay : प्रेमविवाहात अडथळा येतोय? आजपासूनच सुरू करा 'हे' उपाय,त्वरित...

Love Marriage Upay : प्रेमविवाहात अडथळा येतोय? आजपासूनच सुरू करा ‘हे’ उपाय,त्वरित मिळेल फळ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अनेकदा आपल्या कुंडलीत आणि ग्रहमानात गुंतागुतीची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे आपल्या इच्छेनुसार एकही गोष्ट पूर्ण होत नाही. प्रेमविवाहाबाबत देखील असंच आहे. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसोबत आपला विवाह होत नाही. सगळ्या गोष्टी जुळतात परंतु योग जुळत नसल्याने प्रेमविवाह होत नाही.

ज्योतिषशास्तात काही उपाय सांगितले आहे. असे उपाय नियमित केल्याने प्रेमविवाहातील अडथळे दूर होतात. विशेष म्हणजे हे उपाय खूप सोप्पे आहेत. प्रत्येक व्यक्ती ते सहज करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया प्रेमविवाहातील अडथळे दूर करणाऱ्या उपायांबाबत

प्रेम विवाहासाठीचे उपाय…
स्कंद पुराणात जानकी स्तुतिचं वर्णन करण्यात आलं आहे. ज्योतिषशास्त्रात जानकी स्तुतिला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार, प्रेमविवाह व्हावा, प्रेमविवाहातील सर्व अडथळे दूर व्हावे, असं तुम्हाला वाटत असेल तर नियमित भगवान श्री राम आणि माता सीताची पूजा करावी. सोबतच ‘श्रीजानकीस्तुति’च्या एक माळी जप करावा. हा साधा सोप्पा उपाय केल्याने प्रेमविवाहातील सर्व अडथळे, अडचणी दूर होतात. इतकंच नाही तर ‘श्रीजानकीस्तुति’च्या जपाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्टे दूर होतात. सुख-समृद्धी लाभते. अशुभ ग्रहांचा पिच्छा कायमचा सुटतो. हितशत्रुने केलेल्या कारवायांचा आपल्यावर कोणताही विपरित परिणाम होत नाही.

श्रीजानकीस्तुति पाठ…
जानकि त्वां नमस्यामि सर्वपापप्रणाशिनीम् ।
जानकि त्वां नमस्यामि सर्वपापप्रणाशिनीम् ॥1॥

दारिद्र्यरणसंहत्रीं भक्तानाभिष्टदायिनीम् ।
विदेहराजतनयां राघवानन्दकारिणीम् ॥2॥

भूमेर्दुहितरं विद्यां नमामि प्रकृतिं शिवाम् ।
पौलस्त्यैश्वर्यसन्त्री भक्ताभीष्टां सरस्वतीम् ॥3॥

पतिव्रताधुरीणां त्वां नमामि जनकात्मजाम् ।
अनुग्रहपरामृद्धिमनघां हरिवल्लभाम् ॥4॥

आत्मविद्यां त्रयीरूपामुमारूपां नमाम्यहम् ।
प्रसादाभिमुखीं लक्ष्मीं क्षीराब्धितनयां शुभाम् ॥5॥

नमामि चन्द्रभगिनीं सीतां सर्वाङ्गसुन्दरीम् ।
नमामि धर्मनिलयां करुणां वेदमातरम् ॥6॥

पद्मालयां पद्महस्तां विष्णुवक्षस्थलालयाम् ।
नमामि चन्द्रनिलयां सीतां चन्द्रनिभाननाम् ॥7॥

आह्लादरूपिणीं सिद्धि शिवां शिवकरी सतीम् ।
नमामि विश्वजननीं रामचन्द्रेष्टवल्लभाम् ।
सीतां सर्वानवद्याङ्गीं भजामि सततं हृदा ॥8॥

इति श्रीस्कन्दमहापुराणे सेतुमाहात्म्ये श्रीजानकीस्तुतिः सम्पूर्णा ।

( Disclaimer: वरील माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. TajiBatmi.com याचे समर्थन करत नाही. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -