भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या खेळीने सर्वांना त्याची ताकद दाखवून दिली होती. उगाचंच नाही विराट कोहलीला किंग म्हणून क्रिकेट जगत ओळखत. मात्र अशातच विराटच्या एका पोस्टमुळे चाहते चिंतेत पडले आहेत. कारण कोहली फॉर्ममध्ये नसताना काहींनी त्याला सन्यास घे म्हणून डिवचलं होतं.
विराट कोहलीने नक्की त्याच्या पोस्टमध्ये असं काय म्हटलं आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांणा उधाण आलं आहे की कोहली आता निवृत्त होऊ शकतो. कोहलीने जी पोस्ट केली आहे त्यामध्ये त्याचा एक पाठमोरा फोटो आहे. या फोटोवर त्याने कॅप्शनमध्ये, 23 ऑक्टोबर 2022 माझ्या कायम आठवणीत राहणारा असेल. क्रिकेटच्या मैदानात अशी ऊर्जा कधी जाणवली नव्हती. कारण ती संध्याकाळ कायम आठवणीत राहणारी होती.
विराट कोहलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो मैदानातून पॅव्हेलियनमध्ये जाताना दिसत आहे. विराटच्या या ट्विटमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी भीती दिसून आली. विराटच्या या पोस्टवर यूजरने लिहिलं की, 2027 पर्यंत निवृत्त होऊ नकोस असं म्हटलं आहे. त्यासोबतच भाऊ अशी पोस्ट करू नको, इकडे हृदयाचे ठोके वाढले होते. काही वेळ असं वाटलं होतं की तू निवृत्ती घेतलीस.
विराट कोहली होणार निवृत्त? ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांनाही बसला धक्का!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -