Sunday, February 23, 2025
Homeआरोग्यरोज सकाळी आंघोळ करताना ही चूक केल्याने होतो कोंडा, काय आहेत घरगुती...

रोज सकाळी आंघोळ करताना ही चूक केल्याने होतो कोंडा, काय आहेत घरगुती उपाय?


हिवाळ्यात अनेकांना केसात कोंडा होण्याची समस्या होते. काही लोक हिवाळ्यात बरेच दिवसांनी केस धुतात त्यामुळे त्यांना कोंडा होण्याची तक्रार सुरू होते असे मानले जाते. काही तज्ञांच्या मते हिवाळ्यात वाहणाऱ्या कोरड्या आणि थंड वाऱ्यामुळे टाळू कोरडी पडते आणि त्यामुळे कोंड्याची समस्या होते. परंतु वेळेवर आणि स्वच्छ केस धुतल्यास कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. परंतु काही जणांनी नियमित केस धुताल्यानतंरही त्यांच्या केसात कोंडा होतो आणि तो का झाला याचे कारण अनेकांच्या लक्षात येत नाही. खरे तर असे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यातील एक कारण म्हणजे केस धुताना झालेल्या चुका. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका चुकीविषयी सांगणार आहोत.



या चुकीमुळे होऊ शकतो कोंडा
हिवाळ्यात केस धुताना काही चुका केल्यामुळे तुम्हाला कोंड्याची समस्या होऊ शकते. हिवाळ्यात अनेक जाणांना गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते. काही लोक असे असतात जे खूप गरम पाण्याने अंघोळ करतात. परंतु डोक्यावर जास्त प्रमाणात गरम पाणी वापरल्याने कोंडा होऊ शकतो. वारंवार केस धुतल्यानंतरही तुम्हालाही कोंडा होत असेल तर तुम्ही तुमचे डोके खूप गरम पाण्याने तर धुत नाही आहात ना याची खात्री करा आणि धुत असाल तर सामान्य पाण्याने आंघोळ करा.

गरम पाण्यामुळे का होतो कोंडा?
हिवाळ्यात टाळू कोरडी होते आणि त्यावर गरम पाणी टाकल्याने त्वचेच्या पेशी खराब होऊ लागतात. पेशी खराब झाल्याने टाळूवर पांढरा थर तयार होऊ लागतो आणि त्यामुळे कोंडा होतो. तसेच गरम पाण्याने केसांच्या मुळांची छिद्रे उघडतात आणि थंड वारा टाळूला आतून कोरडे करतो. त्यामुळे डोके धुण्यासाठी जास्त गरम पाण्याचा वापर करू नये. तुम्ही केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -