Monday, August 4, 2025
Homeतंत्रज्ञान2 Sim Card ट्रेंड संपणार! वाढत्या रिचार्ज प्लान्सचा ग्राहकांना फटका

2 Sim Card ट्रेंड संपणार! वाढत्या रिचार्ज प्लान्सचा ग्राहकांना फटका

स्वस्त टेलिकॉम सेवांसाठी आजही अनेक स्मार्टफोन (Smart phone) युजर्स 2 सिम कार्ड (2 Sim Card Trend) वापरतात. मात्र, दिवसेंदिवस रिचार्ज प्लॅन्सची किंमत (Mobile Recharge Plan Hike) वाढत आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिच्यावर होत आहे. त्यामुळे येत्या काळात 2 सिम कार्ड वापरण्याचा ट्रेंड बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापूर्वी टेलिकॉम सेवा स्वस्त होत्या सोबत Sim Active ठेवण्यासाठी दरमहा रिचार्ज करण्याची सक्ती नव्हती. त्यामुळे लोक ड्युअल किंवा सेकंडरी सिम सहज वापरत होते. आता परिस्थिती बदलली आहे. टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहे. आगामी काळात यात आधी वाढ होणार आहे. आधीच वाढलेले रिचार्ज प्लान आणि त्यात सेकंडरी सिम सक्रिय ठेवणे युजर्ससाठी महाग होणार आहे. त्यामुळे हळूहळू सेकंडरी सिमचा ट्रेंडचा पूर्णपणे संपेल असे जाणकारांचे मत आहे.
टेलिकॉम कंपन्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच रिचार्ज प्लानच्या किमती वाढवल्या होत्या. यावेळीही रिचार्ज प्लानच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. याबाबत Airtel ने तसे संकेत दिले आहेत.

दरम्यान, नुकतेच एअरटेलने दोन सर्कलमध्ये आपल्या किमान रिचार्ज प्लान महाग केले आहेत. ही वाढ केवळ चाचणी असून येत्या काही दिवसांत ती सर्व सर्कलमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. एअरटेलने डिसेंबर 2021 मध्ये 79 रुपयांच्या किमान रिचार्ज प्लॅनची किंमत 99 रुपयांपर्यंत वाढवली होती.

प्लान्सच्या किमतीत 25 टक्के वाढ?
टेलिकॉम कंपन्या गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षी देखील रिचार्ज प्लानमध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ करू शकते. कंपन्या आपला महसूल वाढण्यासाठी ही वाढ करणार असल्याचे बोलले जाते. प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत वाढल्यास कंपनीचा एआरपीयू आणि एकूण महसूल अधिक चांगला होईल. 5G सेवा लाँच केल्यानंतर, टेलिकॉम कंपन्या रिचार्ज महाग करू शकता. Airtel आणि Vodafone-Idea ने याबाबत अनेकदा संकेत दिले आहे.

सेकंडरी सिमचा वापर होणार बंद?
आधी टेलिकॉम सेवा स्वस्त होत्या त्यामुळे दोन सिम वापराने युजर्सला सहज शक्य होत होते. त्यावेळी एका पेक्षा एक स्वस्त प्लान्स उपलब्ध होते. मात्र, आता सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सच्या प्लान्सची किंमत जवळपास सारखीच असून आगामी काळात त्यांच्या किमतीत फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही सिम सक्रिय ठेवणे खर्चिक ठरणार आहे. त्यामुळे हा खर्च टाळण्यासाठी लोक मोठ्या संख्येने सेकंडरी सिमचा वापर बंद करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -