Tuesday, December 24, 2024
Homeब्रेकिंगशिवरायांचा अवमान करून राज्यपाल उघडमाथ्याने कसे फिरतायत?, हा कुठला न्याय आहे?; संभाजीराजेंचा...

शिवरायांचा अवमान करून राज्यपाल उघडमाथ्याने कसे फिरतायत?, हा कुठला न्याय आहे?; संभाजीराजेंचा सवाल

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेचे झोड उठत आहे. आज स्वराज्याच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात आंदोलन करत काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केल्याने संभाजीराजे छत्रपती आक्रम झाले असून त्यांनी ट्विट करत शिंदे- फडणवीसांवर निशाणा साधला. राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक ! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा ! हा कोणता न्याय? असा सवाल संभाजीराजेंनी केला.

संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यांनी म्हंटले आहे की, राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक ! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा ! हा कोणता न्याय ? स्वराज्य च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, मग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून उघड माथ्याने कसे फिरत आहेत?

आमच्या दैवतांचा, महापुरुषांचा अवमान करून कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संविधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलिस कारवाई करतात. हा कुठला न्याय आहे ? असा सवाल ट्विटच्या मध्यातून संभाजीराजेंनी विचारला आहे.

पुणे येथे आज राज्यपाल यांचा दौरा होता, त्याच दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला. ‘राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा’ या घोषणेखाली निषेध व्यक्त करत असताना स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. एकूणच याच मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत या कारवाईचा एकप्रकारे निषेध व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -