टीम इंडियाचा पहिल्या मॅचमध्ये पराभव झाल्यापासून सोशल मीडियावर खेळाडूंवर जोरदार टीका केली जात आहे.एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने चाहत्यांच्या अधिक जिव्हारी लागला आहे. दुसऱ्या सामन्यात तरी टीम इंडिया बांगलादेशचा करणार का ? असा संतप्त सवाल चाहते करीत आहे. कालचा सामना एकदम रोमांचक झाला. बांगलदेशच्या टीमने एक विकेट राखून टीम इंडियाचा पराभव केला. सात डिसेंबरला टीम इंडियाची दुसरी मॅच होणार आहे.
टीम इंडियाचा दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी शेर ए बांग्ला स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. तिथं टीम इंडियाला खेळाडूंना चांगली खेळी करावी लागणार आहे. कारण बांगलादेशने समजा तो सामना जिंकला तर मालिका त्यांच्या नावावर होईल. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा एकदिवसीय सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
कालच्या मॅचमध्ये बांगलादेशच्या खेळाडूंनी चांगली खेळी केली, त्यामुळे त्याचा विजय झाला. त्याचबरोबर टीम इंडियाच्या खेळाडूंची खराब फिल्डींग झाल्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला. टीम इंडियाची दुसरी मॅच सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. दुसऱ्या मॅच चाहत्यांना सोनी नेटवर्क या वाहिनीवरती पाहता येणार आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.
बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
लिटन दास (कर्णधार, यष्टिरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, नमस अहमद, इबादत हुसेन.