Tuesday, December 24, 2024
Homeतंत्रज्ञानधमाकेदार पॉवर बँक लॉंच, चक्क उन्हात होणार चार्ज..धमाकेदार पॉवर बँक लॉंच, चक्क...

धमाकेदार पॉवर बँक लॉंच, चक्क उन्हात होणार चार्ज..धमाकेदार पॉवर बँक लॉंच, चक्क उन्हात होणार चार्ज..

स्मार्टफोन असो किंवा लॅपटॉप हे आपल्याला वारंवार चार्जिंग करावे लागतात. आपल्या घरातील लाईट गेलेली असेल तरी समस्या अधिक जाणवते. मग कामाच्या वेळी आपली गैरसोय होते यापेक्षा पलीकडे जाऊन आपण पॉवर बॅंक ने मोबाईल चार्ज करू शकतो पण आता एका कंपनीने अशी एक पावर बॅंक आणली आहे जी विशेष आहे.

मार्केटमध्ये सध्या अनेक काही खास डिव्हाईस येत आहेत, ज्याचा वापर पाहून आपण देखील आश्चर्यचकित होतो. आता सध्या बाजारात जबरदस्त फिचर्स असलेली पॉवर बॅंक लॉंच झाली आहे, जी चक्क उन्हात चार्ज होणार आहे.

Dexpole Solar Power Bank चे फीचर्स:

▪️ Dexpole कंपनीची ही पॉवर बँक 65 वॉट USB-C चार्जिंग सपोर्ट आणि सोलर बॅटरीसह येतो. तसेच 24,000 mAh ची दमदार बॅटरी त्यात दिली आहे जी 5 तासात फुल चार्ज होते, असं कंपनीचं म्हणणं आहे.

या पॉवर बँकमध्ये 4 सोलर पॅनेल असून वॉल सॉकेटची देखील सुविधा आहे. वजन 1.2 किलो असून ही पॉवर बँक 2 तासांमध्ये फुल चार्ज करता येईल. त्यात एलईडी डिस्प्ले दिला आहे. आयफोन 14 प्रो मॅक्स ला 4 वेळा आणि iPad Pro ला 2 वेळा चार्ज करू शकते.

▪️ किंमत: या पॉवर बँकवर 41% डिस्काउंट दिला जातोय. म्हणजे जवळपास 11,871 रुपये तुम्हाला मोजावे लागू शकतात. याशिवाय कंपनी यावर 1 वर्ष वॉरंटी आणि नेहमी कस्टमर सपोर्ट देखील देते. हे प्रोडक्ट लवकरच ई-कॉमर्स वेबसाईटवर येऊ शकते किंवा तुम्ही खरेदीसाठी गूगल वर अधिक माहिती घेऊ शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -