Saturday, August 2, 2025
Homeयोजनानोकरीगुरूवारी 8 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

गुरूवारी 8 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे गुरुवार दि. 8 डिसेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. याचा जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

या मेळाव्यात बारावी, दहावी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, अशा प्रकारचे २४० पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in

या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन ॲप्लाय करावे. जेणेकरुन त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या ऑनलाईन पध्दतीने किंवा कंपनीमध्ये प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.

रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 02162-239938 या दुरध्वनीवर संपर्क साधावा असेही आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -