ताजी बातमी ऑनलाईन टीम
एकीकडे जगभरातील सर्व देशांमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) वापरात आणण्यावर भर दिला जात आहे, तर दुसरीकडे एक असा देश आहे जो EV वर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. ईव्हीवर बंदी घालणारा स्वित्झर्लंड हा जगातील पहिला देश ठरू शकतो. हिवाळ्याच्या काळात देशात ऊर्जेची कमतरता भासू नये म्हणून स्वित्झर्लंडमध्ये हे पाऊल उचलले जात आहे. सुंदर बर्फाच्छादित पर्वत असलेला स्वित्झर्लंड देश हा फ्रान् आणि जर्मनी यांसारख्या शेजारील देशांकडून आवश्यक असलेली वीज आयात करतो.
ऊर्चेची कमतरता
यावेळी रशिया-युक्रेन युद्धामुळे नैसर्गिक वायूचा पुरवठा कमी झाल्याने या देशांतील ऊर्जा उत्पादनात मोठी घट झाली आहे. या युरोपीय देशांना ऊर्जेचा तुटवडा जाणवण्याची ही काही दशकांत पहिलीच वेळ आहे. फ्रान्सही आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षांत प्रथमच ऊर्जा आयात करत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वित्झर्लंड एक असा देश आहे जिथे हिवाळ्याच्या काळात तापमान अत्यंत कमी होते. देशभरात अनेक भागात जोरदार हिमवृष्टीही होते. त्यामुळे तेथील वीजपुरवठाही प्रभावित होतो. विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन देशात इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालण्याचा विचार केला जात आहे.