Wednesday, March 12, 2025
Homeक्रीडाभारतीय संघाला मोठा धक्का, रोहित शर्मा मैदानातून थेट रुग्णालयात दाखल..!!

भारतीय संघाला मोठा धक्का, रोहित शर्मा मैदानातून थेट रुग्णालयात दाखल..!!

भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेत दुसऱ्या वन-डे सामन्यात टीम इंडियाला आज दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला. स्लिपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहितच्या हातावर जोरात बाॅल आदळल्याने त्याला मैदान सोडावे लागले.

नेमक काय घडलं..?

बांगलादेशने टाॅस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताकडून दुसरे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज आला. या ओव्हरमध्ये चौथ्या बाॅलवर रोहितकडून अनामुलचा स्लीपमध्ये कॅच सुटला.

जबरदस्त वेगातील चेंडू रोहितच्या डाव्या हातावर आदळला. हातातून रक्तही येत होते. प्रचंड वेदनांनी विव्हळत रोहितने मैदान सोडले. काही वेळ ड्रेसिंग रुममध्ये बसून, मॅच पाहिल्यावर हाताचे स्कॅन करण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

मालिकेआधीच मोहम्मद शमी बाहेर झाला होता. त्यानंतर पहिल्या वन डेपूर्वी ऋषभ पंतने मालिकेतून माघार घेतली. पाठदुखीमुळे दुसऱ्या वन-डे सामन्यात कुलदीप सेन खेळत नाही. त्यात आता रोहितची भर पडलीय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -