Sunday, December 22, 2024
HomeमनोरंजनDeepika Padukone करणार फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण, हा सन्मान मिळवणारी पहिली अभिनेत्री!

Deepika Padukone करणार फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण, हा सन्मान मिळवणारी पहिली अभिनेत्री!

दीपिका पदुकोण ही बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. हिंदीसोबतच हॉलिवूड चित्रपटांमध्येही तिने नाव कमावले आहे. अभिनेत्री नुकतीच सर्कस चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंगसोबत दिसली. त्याच वर्षी तिने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यादरम्यान तिचे खूप कौतुक झाले. आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा देशाचे नाव कमावणार आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत दीपिका मोठी भूमिका बजावणार असल्याचे वृत्त आहे.

सध्या संपूर्ण जग फिफा वर्ल्डकपसाठी क्रेझी आहे आहे. प्रत्येकजण आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करत आहे. दरम्यान नोरा फतेहीनंतर आता दीपिका पदुकोण देखील फिफा वर्ल्ड कपमध्ये दिसणार आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकप ट्रॉफीच्या अनावरणाची जबाबदारी दीपिका पदुकोणकडे सोपवण्यात आली आहे. 18 डिसेंबर 2022 रोजी फिफा वर्ल्ड कपचे अनावरण होणार आहे. यासाठी अभिनेत्री लवकरच कतारला रवाना होणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हा सन्मान मिळवणारी पहिली अभिनेत्री
36 वर्षीय दीपिका पदुकोण जगातील सर्वाधिक प्रसिद्ध क्रीडा स्पर्धेत असा मान मिळवणारी पहिली अभिनेत्री असेल. 18 डिसेंबर रोजी, दीपिका पदुकोण कतारमधील लुसेल आयकॉनिक स्टेडियमवर विश्वचषक ट्रॉफीचे उद्घाटन करणार आहे. यापूर्वी फिफा विश्वचषकादरम्यान, अभिनेत्री नोरा फतेही कतारमधील फिफा फॅन फेस्टमध्ये परफॉर्म केल्यामुळे चर्चेत आली होती. ‘लाइट द स्काय’ या वर्ल्ड कप गाण्यावर डान्स करताना त्याने फिफा वर्ल्ड कप स्टेजवर तिचा जलवा दाखवला होता.

शाहरुखसोबत आगामी चित्रपट
दीपिका पदुकोण लवकरच बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान पठाण चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात या दोघांसोबत अभिनेता जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पठाण हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातून शाहरुख खान बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. पठाण हा चित्रपट पुढील महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -