मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई एक संशयित आरोपी अटकेत तर एलसीबी कडून दुसरा आरोपी अटकेत
मिरज येथील जुना मालगाव रोड सांगलीकर मळा येथे अज्ञात तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना जुना मालगाव रोड जुना मालगाव रोड येथे झुडुपात युवकाचा मृतदेह चेहरा छिन्नविच्छिन्न झालेल्या अवस्थेत मिळून आला.नागरिकांनी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवली, घटनास्थळी पोलिस उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके,पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी भेट दिली, गुन्हे अन्वेषण विभागाचे नितीन सावंत व पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली,चेहरा ठेचला गेल्याने ओळख पटविणे अवघड झाले होते.
शहरात घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली बघ्यांनी मृतदेह पाहण्यासाठी गर्दी केली होती,तात्काळ पोलिसांनी तपासाची यत्रणा लावली मयत युवक हा ऋषिकेश जाधव वय 23 राहणार घोरपडे वाडा मिरज असे मृत तरुणाची ओळख पटविली ,यातूनच पोलिसांना पुढील तपास गतीने केल्याने या खून करणाऱ्या दोन युवकांचे नाव निष्पन्न झाले.दोघेही मृत ऋषिकेश याचे मित्र असल्याचे समजले यात पोलिसांनी अक्षय विश्वनाथ पिसाळ वय 28 रा. कमानवेस माळी गल्ली तर दुसरा आरोपी दीपक हलवाई वय 27 राहणार पाटील गल्ली मिरज यांचा समावेश आहे,यातील अक्षय पिसाळ याला ताब्यात घेतले असून पोलिसांनी काही तासातच गुन्ह्याचा छडा लावला आहे.तिघेही काल संध्याकाळी या भागात मद्य पीत बसल्याचे कळते, मद्य पिता पिता वादाच्या कारणातून दगडाने ठेचून ऋषिकेश याचा निर्घृण खून केल्याचे कळते,खून करून दोघेही मोटारसायकल वरून फरार झाले होते त्यातील एकाला मिरज शहर पोलिसांनी सुभाष नगर येथून अटक केली तर दुसऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे सदर घटनेची माहिती समजताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली,अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल उप अधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजीव झाडे,स.पोलिस निरीक्षक नितीन सावंत, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार व त्यांच्या पथकाने तसेच शहर पोलिसांचे पथकातील विष्णू काळे,पृथ्वी काबळे,सचिन सनदी,नागेश मासाळ,सचिन फडतरे,योगेश परीट,गजानन बिराजदार यांनी कारवाई केली आहे.