फेक इन्स्टाग्राम अकाउंट बनवून त्याद्वारे महिलेची बदनामी करणाऱ्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
याप्रकरणी गुरुवारी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मैत्रिण यांची बदनामी करण्याच्या हेतूने फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणीचा फोटो वापरून खोटे इन्स्टाग्राम अकाऊंट खाते उघडले व त्यावर घाणघाण शब्द असलेली स्टोरी अपलोड केली. Randihanisaniya नावाचा ग्रुप तयार करत त्यामध्य़ेही अश्लिल मॅसेज प्रसारीत करत बदनामी केली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.