Thursday, July 31, 2025
Homeतंत्रज्ञानVivo ने लॉन्च केला 5G मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Vivo ने लॉन्च केला 5G मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

प्रसिद्ध मोबाईल कंपनी Vivo ने आपला 5G मोबाईल Y35 मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. या मोबाईल तगडी स्क्रिन, मजबूत बॅटरी आणि जबरदस्त फीचर्स मिळतात. हा मोबाइल ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड या 3 रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आज आपण जाणून घेऊया विवो च्या या नव्या मोबाईलची किंमत आणि वैशिष्ट्यांबाबत…

फीचर्स–
स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Vivo Y35 5G मध्ये 6.51-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन HD + 720 x 1600 पिक्सेल आहे. या मोबाईल ला 60Hzचा रीफ्रेश रेट आणि 120Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट मिळतो. या मोबाईलला 8W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळते.

ड्युअल कॅमेरा सेटअप-
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, विवोच्या या मोबाईल मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यामध्ये 13MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोन मध्ये 5MPचा फ्रंट कॅमेरा आहे. या मोबाईल मध्ये एलईडी फ्लॅश देखील उपलब्ध आहे. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी 5G, ब्लूटूथ 5.2, USB-C पोर्ट, Wi-Fi 802.11ac आणि 3.5mm ऑडिओ जॅक, साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर यांसारखी सुविधा मिळते.

किंमत –

Vivo Y35 5G ३ व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च केला आहे . यामध्ये 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा समावेश आहे. सध्या हा मोबाईल फक्त चीनमध्ये लॉन्च करण्यात आला असून या मोबाईलची किंमत अनुक्रमे 1,199 युआन (रु. 14,138), 1,399 युआन (रु. 16,521) आणि अनुक्रमे 1,499 युआन (17,672 रुपये) आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -