Thursday, July 31, 2025
Homeतंत्रज्ञानमस्क यांनी केली 150 कोटी ट्विटर अकाउंट बंद करण्याची घोषणा, पण का?

मस्क यांनी केली 150 कोटी ट्विटर अकाउंट बंद करण्याची घोषणा, पण का?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे नवीन मालक एलन मस्क यांनी प्लॅटफॉर्मवरून 150 कोटी ट्विटर खाती हटवण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी, मस्क यांनी ट्वीट केले की कंपनी अनेक वर्षांपासून प्लॅटफॉर्मवर निष्क्रिय असलेले ट्विटर अकाउंट्स काढून टाकेल. नुकताच ट्विटर फाईल्सचा खुलासा झाल्यानंतर, मस्क यांनी आणखी एक अपडेट जारी करण्याबद्दल भाष्य केले आहे, ज्यामध्ये हे कळेल की कंपनी एखाद्याला ब्लॅकलिस्ट कशी करते आणि काही खात्यांना दाखवणे कसे मर्यादित करते.



असे अकाउंट्स केले जातील डिलीट
ट्विटर स्पेसमध्ये असे अनेक अकाउंट्स आहेत, जे तयार करुन लोक विसरुन गेले आहेत. या खात्यांना केवळ एकदाच लॉगइन करण्यात आले आहे. तसेच, अशी इतर अनेक Twitter खाती आहेत जी तयार केल्यानंतर अनेक वर्षे लॉग इन केलेली नाहीत आणि जवळपास कोणतेही ट्वीट केलेले नाहीत. अनेकवेळा असे देखील होते की यूझर्सने अकाउंट तयार केले आहे परंतु पासवर्ड विसरला आहे आणि नवीन खाते तयार केले आहे. अशी खाती हटवून मस्क यांना ट्विटर स्पेस कमी करायचा आहे.

मस्क यांनी स्वतः दिली अकाउंट्स डिलीट करण्याची माहिती
मस्क यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘कंपनी लवकरच 1.5 बिलियन (150 दशलक्ष) ट्विटर खाती डिलीट करणार आहे. कंपनीच्या या पाऊलामुळे, 150 कोटी अकाउंट्सची नावे ट्विटर स्पेसमधून रिकामी होतील.’ मस्क यांना प्लॅटफॉर्म Twitter 2.0 बनवायचा आहे. कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर पाठवलेल्या ई-मेलमध्येही त्यांनी याचा उल्लेख केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -