ताजी बातमी ऑनलाईन टीम
उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ ‘मंदोस’ आज रात्री म्हणजेच 9 डिसेंबर रोजी रात्री उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ ममल्लापुरमजवळील किनारपट्टी ओलांडताना पुढे सरकेल. त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामानाचे स्वरूप बदलणार आहे. यामुळे राज्याच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांनी यामुळे सतर्क राहावे असे आवाहन केली हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
या’ चार दिवसात पावसाची शक्यता
शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण भारतात तयार झालेल्या ‘मंदोस’ या चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IMD नुसार, नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांत 11 ते 14 डिसेंबर दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 11 ते 14 डिसेंबर दरम्यान राज्यात पावसाची दाट शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या काळात ढगाळ वातावरण असेल, परंतु काही भागात हलका पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.