Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; ट्रकच्या धडकेत महिला ठार, मुलीसह दोघी जखमी

कोल्हापूर ; ट्रकच्या धडकेत महिला ठार, मुलीसह दोघी जखमी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवाजी विद्यापीठानजिक ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाली तर त्यांची 4 वर्षाची चिमुरडी व अन्य एक वृद्ध महिला किरकोळ जखमी झाल्या. रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शितल सचीन कवडे (वय 30 रा. पद्माराजे हौसिंग सोसायटी उजळाईवाडी ता. करवीर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर ईशिता कवडे, वैजयंती अशोक पाटील अशी जखमींची नावे आहेत. ट्रकच्या धडकेत दुचाकी सुमारे 20 ते 25 फुट ओढत नेली.



याबाबतची माहिती अशी, रविवारी सकाळी शितल कवडे त्यांची मुलगी ईशितासह वैजयंती पाटील यांच्या नातेवाईकांकडे टेंबे रोडवर आल्या होत्या. नातेवाईकांची भेट घेवून ओढय़ावरील गणपतीचे दर्शन घेवून त्या मोपेडवरुन तिघी घरी जात होत्या. शिवाजी विद्यापीठ पोस्ट ऑफीस चौकानजीक कागलकडे निघालेल्या एका ट्रकची त्यांना जोरदार धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील वैजयंता आणि ईशिता या खाली पडल्या. तर शीतल ट्रकच्या चाकाखाली सापडल्या.

ट्रकचे मागील चाक शितल यांच्या पायावरुन गेल्यामुळे त्यांच्या कंबरेखालील भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना 108 रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले, तर वैजयंता पाटील आणि ईशिता यांना जीतेंद्र शिंदे यांनी त्यांच्या रिक्षातून सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान शीतल कवडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली. पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले. अपघाताची माहिती मिळताच कवडे आणि पाटील कटुंबीयांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. नातेवाईकांनी केलेला आक्रोश हदय पिळवटून टा होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -