Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात

पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान, मोर्चामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आलाय. तसेच सुरक्षेसाठी 7500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्यात यावं ही यातील प्रमुख मागणी आहे. बंदच्या निमित्ताने शहरात मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हेदेखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे. लाल महालाजवळ जाहीर सभेने मोर्चाचा समारोप होणार आहे.

पुरोगामी संघटनांकडून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
विविध सामाजिक संघटना, दलित संघटना, राज्यातील विरोधी पक्ष तसेच पुरोगामी संघटनांकडून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल आहे. शहरातील व्यापारी महासंघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे मर्चंट चेंबर त्याच प्रमाणे वाहतूक संघटनानी या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केला आहे.

संपूर्ण मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय
छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत तसेच महापुरुषाबाबत वारंवार अपमानास्पद केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुणे शहर बंद बाबत पुकारण्यात आला आहे. त्याविरोधात संपूर्ण मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय सर्व संबधित संघटनांनी घेतला आहे. मार्केट यार्ड आज रात्रीपासूनच बंद आहे.

शाळा बंदबाबत संभ्रम, सार्वजनिक वाहतुकीवर बंदचा परिणाम!
शहरातील शाळा महाविद्यालयमध्ये बंद बाबत कुठल्याच स्वरूपाच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. असं असलं तरी रिक्षा वाहतूक तसेच सार्वजनिक वाहतुकीवर बंदचा परिणाम अपेक्षित आहे. त्यामुळे शाळामध्ये फारशी उपस्थिती असण्याची शक्यता नाही. पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये सुमारे साडेसात हजार पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -