Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरआईने मित्रांना घरी जेवायला बोलवण्यास नकार दिल्याने आत्महत्येचा प्रयत्न

आईने मित्रांना घरी जेवायला बोलवण्यास नकार दिल्याने आत्महत्येचा प्रयत्न

आईने आपला हट्ट पुर्ण केला नाही या कारणावरून पुलाची शिरोलीत शाळकरी मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे वाढदिवसादिवशी त्याने स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. एकुलत्या एक मुलाने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे आईचा जीव कासावीस झाला होता. गळफास सोडवून त्याला कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात दाखल करेपर्यंत आईच्या डोळ्यातुन अखंड अश्रूंच्या धारा वहात होत्या. योग्य वेळी गळफास सोडवून वेळेत उपचार सुरू झाल्याने मुलाचे प्राण वाचले. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला.

वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या चेमित्रांना घरी जेवायला बोलवाय असे मुलाने हट्ट केला होता. पण आर्थिक परिस्थिती नसल्याने आईने मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मुलाचे समाधान न झाल्याने त्याने राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच आईने गळफास सोडवल्याने अनर्थ टळला. उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल केले. उपचारानंतर आता मुलाची प्रकृती स्थिर आहे.

तीन वर्षापूर्वी पतीची साथ सुटली. एकुलत्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी आई शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका फौन्ड्री उद्योगात वाळू चाळण्याचे काम करत आहे. आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने मुलाच्या सर्व इच्छा पूर्ण करणे शक्य नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने घरात मित्रांसाठी जेवण करण्याचा हट्ट मुलाने आईकडे धरला. आईने त्याला चिरमुरे, फरसाण आणि केक आणून वाढदिवस साजरा करण्यास सांगितले. हे मान्य नसल्याने मुलाने गळफास घेतला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -