Thursday, July 31, 2025
Homeतंत्रज्ञाननवीन वर्षात व्हॉट्स अ‍ॅपमध्ये होणार मोठे बदल, युजर्सना मिळणार अनेक सुविधा…

नवीन वर्षात व्हॉट्स अ‍ॅपमध्ये होणार मोठे बदल, युजर्सना मिळणार अनेक सुविधा…

व्हॉट्स अ‍ॅप.. जगात सर्वाधिक वापरले जाणारे अ‍ॅप. आपल्या युजर्ससाठी व्हॉट्स अ‍ॅप कंपनीकडून सातत्याने नवनवीन फिचर्स सादर केले जातात. आगामी नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्येही या अ‍ॅपमध्ये धमाकेदार फीचर्स येणार आहेत.

व्हॉट्स अ‍ॅपमध्ये येणारे फीचर्स

▪️ येत्या वर्षभरात व्हॉट्स अ‍ॅपमध्ये कॉल रेकॉर्डिंगचे फीचर्स येऊ शकते. विशेष म्हणजे, समोरची व्यक्ती कॉल रेकॉर्ड करतेय, हे कळणारही नाही. युजर्संना कॉल रेकॉर्डिंग फीचर डिसेबलही करता येईल.

▪️ व्हॉट्स अ‍ॅपमध्ये आता एडिट मेसेज फीचर येईल. त्यामुळे यूजर्सना ऑटो डिलीट, डिलीट मेसेज, तसेच मेसेज एडिटचीही सुविधा मिळेल. मेसेज पाठवल्यानंतर 5 मिनिटांतच एडिट करता येईल.

▪️ मेसेज शेड्यूल करण्याचाही पर्याय मिळणार आहे. त्यामुळे ऑफिसच्या कामासाठी जे लोक हे अ‍ॅप वापरतात किंवा जे जास्त अ‍ॅक्टिव्ह असतात, त्यांच्यासाठी हे फिचर खूप उपयुक्त ठरणार आहे.

▪️ आता अनसेंड फीचर येणार असून, युजरने मेसेज अनसेंड करताच समोरच्या व्यक्तीच्या चॅटमधून तो गायब होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -