इंडियन ऑईलमध्ये 1760 जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज..
इंडियन ऑईलमध्ये ॲप्रेंटिस पदांच्या 1760 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 03 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.
पदाचे नाव आणि जागा: एकूण 1760 जागा
1) ट्रेड ॲप्रेंटिस
2) टेक्निशियन ॲप्रेंटिस
3) पदवीधर ॲप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: [जनरल/ओबीसी: 50% गुण, एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: 45% गुण]
▪️ ट्रेड ॲप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण + आयटीआय/12वी उत्तीर्ण
▪️ टेक्निशियन ॲप्रेंटिस: डिप्लोमा.
▪️ पदवीधर ॲप्रेंटिस: बीए / बी. कॉम / बी.एससी.
ऑनलाईन अर्ज करा: www.ioclmd.in
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जानेवारी 2023 (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) आहे.
वयोमर्यादा: 31 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी : फी नाही
अधिकृत वेबसाईट: www.iocl.com
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत