हातकणंगले तालुक्यातील कोरोची ग्रामपंचायत निवडणूक प्रचार , रणधुमाळी वाजू लागली आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीने प्रचाराची अनोखी पद्धत लढवत आहेत. कोणी सायकलवर तर कोणी गाडीतून, तर कोणी रिक्षातून आपला प्रचार करू लागले आहेत. कोरोची गावामध्ये काही स्थानिक आघाड्याने बेकायदेशीरपणे डिजिटल बोर्ड प्रत्येक चौकाचौकांमध्ये लावले आहेत. निवडणूक आयोग व पोलिसांकडून याची कोणती परवानगी घेतली नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार सॅम आठवले यांनी आज निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
शहापूर पोलीस ठाणे प्रशासन व निवडणूक प्रशासन यांनी आचारसंहिता भंग केल्याप्रसंगी सार्वजनिक ठिकाणी डिजिटल बोर्ड लावणाऱ्या उमेदवारांच्या वर कारवाई करावी अन्यथा बाकीचे उमेदवार हि बेकायदेशीर रित्या सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावतील. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा सरपंच पदाचे उमेदवार सॅम आठवले यांनी निवडणूक आयोगाला व पोलीस प्रशासना दिला आहे.
आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून प्रचार करत आहेत पण विरोधक कायदा धाब्यावर बसवून वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत आहेत यामध्ये डिजिटल बोर्ड लावून बेकायदेशीरपणे कोणती प्रशासनिक परवानगी न घेता प्रचार करत आहेत. याच अनुषंगाने हे डिजिटल बोर्ड काढावेत व त्यांच्यावर निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सरपंच, उमेदवार, कोरोची गावचे अपक्ष उमेदवार यांनी लेखी तक्रार हातकणंगले तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.
जर निवडणूक आयोगाने जर याची दखल घेतली नाही तर आम्हीही प्रत्येक चौकात चौकामध्ये घरावर डिजिटल बोर्ड लावून याला सर्वस्वी जबाबदार निवडणूक आयोग व पोलीस प्रशासन राहील असा इशारा सॅम आठवले यांनी दिला आहे. कोरोची गावामध्ये डिजिटल बोर्ड लागल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. सध्या या प्रचाराचा जागोजागी चर्चेचा विषय बनला आहे.