Thursday, July 31, 2025
Homeमनोरंजनपठाण चित्रपटातील दीपिका पादुकोण हिच्या बिकिनीच्या रंगावरून मोठा वाद

पठाण चित्रपटातील दीपिका पादुकोण हिच्या बिकिनीच्या रंगावरून मोठा वाद

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा पठाण हा चित्रपट रिलीजच्या अगोदरच वादात सापडलाय. या चित्रपटाचे बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाले असून या गाण्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. काहींना दीपिकाचे कपडे आवडले नाहीतर काहींना तिचे हावभाव आवडले नाहीत. आता या गाण्यामुळे मोठा वाद सुरू झालाय. इतकेच नाहीतर याचा मोठा फटका हा चित्रपटाला बसण्याची दाट शक्यता आहे. कारण एका राज्याच्या गृहमंत्र्यांनी चित्रपट राज्यामध्ये रिलीज करण्याच्या अगोदर विचार करावा लागणार असल्याचे म्हटले आहे.

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, गाण्यात वापरण्यात आलेली वेशभूषा अत्यंत आक्षेपार्ह नक्कीच आहे. भ्रष्ट मानसिकतेमुळे हे गाणे चित्रित करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. इतकेच नाहीतर दीपिका पादुकोण ही जेएनयूमध्ये तुकडे तुकडे गँगचे समर्थन करताना देखील दिसली होती.

पठाण चित्रपटातील गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर बायकॉट पठाण हा ट्रेंड सुरू आहे. आमिर खान याचा लाल सिंह चढ्डा रिलीज होण्याच्या अगोदरच अशाच प्रकारचा ट्रेंड हा सोशल मीडियावर सुरू होता. इतकेच नाहीतर आमिर खानचा चित्रपटही फ्लाॅप गेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -