Thursday, July 31, 2025
Homeतंत्रज्ञानखुशखबर! 'IPHONE'मध्ये 5G सुरू करणारा अपडेट जारी, 'हे' फोन्स करतील सपोर्ट

खुशखबर! ‘IPHONE’मध्ये 5G सुरू करणारा अपडेट जारी, ‘हे’ फोन्स करतील सपोर्ट

अ‍ॅपलने पात्र आयफोन युजर्ससाठी iOS 16.2 update उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे युजर्सना त्यांच्या आयफोनवर ५ जी वापरता येणार आहे.देशात ५ जी सेवा सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. मात्र, काही मोजक्याच स्मार्टफोन्समध्ये ही सुविधा सुरू होती. अ‍ॅपलचे नवीन आणि काही जुन्या सिरीजचे फोन्स ५ जी सपोर्ट करतात, मात्र अपडेटमुळे युजर्सना ५ जी सेवेचा लाभ घेता आला नाही. आता मात्र, अपडेट उपलब्ध होत असल्याने आयफोन युजरला देखील वेगवान इंटरनेटचा वापर करता येणार आहे.

१ ऑक्टोबर रोजी देशात ५ जी सेवा लाँच झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत एअरटेल आणि रिलायन्स जिओने देशातील ५० शहरांमध्ये आपली ५ जी सेवा विस्तारली आहे. एअरटेल आणि रिलायन्स जिओ हे दोन्ही भारतातील आयफोनचे कॅरिअर पार्टनर आहेत.

५ जी सेल्युलर सपोर्टसह iOS 16.2 मध्ये काही नवीन फीचर्स देखील मिळत आहे. यामध्ये अ‍ॅपल म्युझिक सिंग, न्यू होम अ‍ॅप आर्चिटेक्चर, डिस्प्लेवर नेहमीसाठी वॉलपेपर आणि नोटिफिकेशन डिसॅबल करणे, लॉक स्क्रीन स्लिप विजगेट, एअर टॅग अलर्ट, सिरी साइलेंट रेसपॉन्सचा समावेश आहे.

गेल्या महिन्यात अ‍ॅपलने आयओएस १६ बिटा सॉफ्टवेअर प्रोग्राम अंतर्गत चाचणीच्या आधारावर काही निवडक आयफोन युजर्ससाठी ५ जी सेवा सुरू केली होती. निवडक ५ जी युजर्सना एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या कनेक्शनद्वारे ५ जी वापरता येत होते. युजरला आयओएस १६.२ इन्स्टॉल करावे लागेल, असे कंपनीने म्हटले होते. आयफोन युजरला सुपर फास्ट डाऊनलोड आणि अपलोड, चांगली स्ट्रिमिंग आणि रिअल टाइम ५ जी कनेक्टिव्हिटी मिळेल, असे अ‍ॅपलचे म्हणणे आहे.

या फोनमध्ये चालणार ५ जी

आयफोन १४, आयफोन १४ प्लस, आयफोन १४ प्रो, आयफोन १४ प्रो मॅक्स, आयफोन १३, आयफोन १३ मिनी, आयफोन १३ प्रो, आयफोन १३ प्रो मॅक्स, आयफोन १२, आयफोन १२ मिनी, आयफोन १२ प्रो, आयफोन १२ प्रो मॅक्स, आयफोन एसई (तिसरी पीढी)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -