Thursday, July 31, 2025
Homeतंत्रज्ञानलवकरच लॉन्च होणार स्वस्त Electric Bike, एका चार्जिंगमध्ये मिळेल 135KM रेंज

लवकरच लॉन्च होणार स्वस्त Electric Bike, एका चार्जिंगमध्ये मिळेल 135KM रेंज

सध्याच्या महागाईच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. ज्यामुळे आता लोकांचा कल इलेक्ट्रिक गाड्या घेण्याकडे वाढतो आहे. तसेच या काळात अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक गाड्या देखील लाँच केल्या जात आहेत. याच दरम्यान आता हैदराबादची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी असलेल्या Pure EV ने भारतीय बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे.

हे लक्षात घ्या कि, दररोज प्रवास करणाऱ्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली ही एक कम्युटर इलेक्ट्रिक बाईक असेल. जिचे नाव EcoDryft असे असणार आहे. पूर्णपणे भारतात तयार केलेल्या Electric Bike ची किंमत जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, एका चार्जींगमध्ये ही Electric Bike 135 किमी पर्यंत जाऊ शकते. या बाईकमध्ये 3 kWh चा बॅटरी पॅक देखील देण्यात आला आहे. ही बाईक 75 kmph चा टॉप स्पीड देत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीसाठी हे नवीन फ्लॅगशिप प्रोडक्ट असेल. तसेच आपल्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन ग्राहकांना या बाईकची चाचणी देखील घेता येईल.

कम्युटर मोटरसायकल सेगमेंटमध्ये आकर्षक किंमतीत ही नवीन इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या नवीन इलेक्ट्रिक बाईकमध्ये लाल, काळा, राखाडी आणि निळा हे चार रंगांचे पर्याय दिले जाणार आहेत. संपूर्ण भारतात कंपनीने आतापर्यंत 100 पेक्षा जास्त डीलरशिप सुरु केल्या आहेत. यासोबतच, आता कंपनीने आपले सेल्स आणि आफ्टर-सेल्स सर्व्हिस नेटवर्क अपग्रेड करण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.

हे लक्षात घ्या कि, कंपनीकडून याआधीच eTryst 350 नावाच्या Electric Bike ची विक्री केली जात आहे. ज्यामध्ये 3.5 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला असून ज्याच्या चार्जिंगसाठी 6 तास लागतात. तसेच या बाईकची राइडिंग रेंज 90 ते 140 किमी दरम्यान असून त्याचा टॉप स्पीड 85 kmph इतका आहे. या Electric Bike ची इलेक्ट्रिक मोटर 4 kW चे पीक पॉवर आउटपुट देऊ शकते. यासोबतच यामध्ये ड्राईव्ह, क्रॉस ओव्हर आणि थ्रिल नावाने तीन रायडिंग मोड देखील देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -