Thursday, July 31, 2025
Homeब्रेकिंगमहाविकास आघाडीचा विराट मोर्चा!! सत्तांतरानंतर प्रथमच एकत्रितपणे रस्त्यावर

महाविकास आघाडीचा विराट मोर्चा!! सत्तांतरानंतर प्रथमच एकत्रितपणे रस्त्यावर

महाविकास आघाडीने आज मुंबईत विराट महामोर्चा काढला. राज्यपालांसहित भाजप नेत्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान, कर्नाट्क महाराष्ट्र सीमावाद यावरून महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली असून सरकार विरोधात निषेध केला जात आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्च्यामुळे महाविकास आघाडीच्या एकीचे दृश्य महाराष्ट्राला दिसले.

राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या एकीचे दर्शन या मोर्चाच्या निमित्ताने दिसले. आत्तापर्यंत बैठकीत एकत्र दिसलेले महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर एकत्र उतरलेले पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे हे सुद्धा प्रथमच मोर्चात सहभागी झालेले दिसले. अजित पवार, नाना पटोले यांच्या सोबत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे चालताना दिसले. या मोर्चाला समाजवादी पार्टी, भारतीय काम्मुनिष्ठ पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष यांचाही पाठिंबा पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झालेलं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले असून या मोर्चाला विराट रूप प्राप्त झालेलं आहे. एक ऐतिहासिक मोर्चा म्हणून या महामोर्चाची नोंद होईल. या मोर्च्याच्या माध्यमातून आगामी काळात सुद्धा शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र राहणार हे स्पष्ट झालं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -