ग्रेटर नोएडा पोलिसांनी मोठी कारवाई करत विदेशी सायबर गुन्हेगार आणि महाठगांना अटक केली आहे. आरोपींनी बॉलिवूड अभिनेत्रा ऐश्वर्या रॉय-बच्चनसह अनेक सिनेतारकांच्या नावाचा वापर करून अनेकांना कोट्यावधींना चूना लावल्याची देखील धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. आरोपी स्वतःला एका विदेशी फार्मासिटिकल कंपनीचे अधिकारी सांगत होते. आरोपींकडून ऐश्वर्या रॉयसह अनेक बॉलिवूड कलाकारांचे बनावट पासपोर्ट आणि 13 लाख डॉलर्स जप्त करण्यात आले आहेत.
नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फार्मासिटिकल कंपनीकडून स्वस्त दरात औषधी खरेदी करून त्याच महागड्या दरात दुसऱ्या शहरात विक्री करण्याचा गोरखधंदा मागील काही दिवसांपासून सुरू होता. या माध्यमातून आरोपींनी अनेकांना कोट्यावधी रुपयांना देखील चुना लावला. इतकंच नाही तर यासोबत तगड्या कमीशनवर विदेशी करन्सी देऊन अनेकांची आर्थिक फसवणूक देखील करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे 13 लाख रुपयांचे बनावट डॉलर्स देखील पोलिसांनी जप्त केले आहेत.
पोलिस स्टेशन बीटा-2 आणि ग्रेनो सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या 3 विदेशी नागरिकांकडून 3 हजार अमेरिकन डॉलर (जवळपास 2.5 लाख भारतीय रुपये), बनवट 13 लाख अमेरिकन डॉलर (जवळपास 10 कोटी 76 लाख भारतीय रुपये) व 10,500 पाउंड (जवळपास 10 लाख 61 हजार भारतीय रुपये) अशी एकूण 10 कोटी 90 लाख रुपये. तसेच बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चनचा बनावट पासपोर्ट, 6 मोबाइल, 11 सिम, लॅपटॉप, प्रिंटर, पेनड्राइव, 3 कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
तिन्ही विदेशी आरोपी हे मास्टरमाईंड असून त्यांनी आतापर्यंत देशातील अनेक शहरात अनेक बड्या लोकांना कोट्यावधींना चुना लावला आहे. त्यात मेट्रोमोनियल साईट व डेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवणे, लॉटरी फ्रॉड, फेसबुक फ्रेंड बनवून फ्रॉड करणे,विदेशी पार्सल पाठवून तोतया कस्टम अधिकारी बनवून चुना लावणे अशा प्रकारचा गोरखधंदा आरोपी करत होते.
प्रलोभन दाखवून अनेकांची फसवणूक
आरोपी स्वतःला नामांकित विदेशी फार्मासिटिकलस कंपनीचे प्रतिनिधी सांगत होते. फार्मासिटिकल कंपनीकडून स्वस्त दरात औषधी खरेदी करून त्याच महागड्या दरात दुसऱ्या शहरात विक्री करण्याचं प्रलोभन दाखवत होते. आरोपींनी बीटा-2 पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सेवानिवृत्त कर्नलला देखील आपल्या जाळ्यात अडकवले होते. कॅन्सरच्या औषधीच्या नावाखाली आरोपींनी सेवानिवृत्त कर्नलची आरोपींनी 1 कोटी 81 लाख रुपयांची फसवणूक केली. आरोपींना आतापर्यत देशभरत कोण कोणत्या शहरात किती लोकांची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.