राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8वी) पुढील वर्षी 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8वी) या परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 20 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
महत्वाच्या तारखा:
▪️ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इ. 8वी) शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन अर्ज व नियमित शुल्क ऑनलाईन भरण्याची अखेरची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.
▪️ ऑनलाईन अर्ज करण्यास व नियमित शुल्क भरण्यास उशीर झाल्यास विलंब शुल्क 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 दरम्यान भरावे लागणार आहे. तर अतिविलंब शुल्क 26 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान भरावे लागणार आहे.
दरम्यान या परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती. परंतु अजूनही शाळांनी ऑनलाईन माहिती आणि अर्ज भरले नसल्या कारणाने ही मुदतवाढ देण्यात आली असून आता संबंधित शाळांनी आपली माहिती व अर्ज दिलेल्या मुदतीत भरण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.