Sunday, July 27, 2025
Homeयोजनानोकरीभारतीय नौदलातील भरतीबाबत मोठी अपडेट, बेरोजगार तरुणांना पुन्हा संधी..

भारतीय नौदलातील भरतीबाबत मोठी अपडेट, बेरोजगार तरुणांना पुन्हा संधी..

अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय नौदलात तब्बल 1400 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ‘अग्निवीर (SSR) 01/2023’ बॅच या पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. या भरतीबाबत नुकतीच मोठी अपडेट समोर आली आहे.

अग्निवीर पदासाठी अर्ज करण्याची मुदत 17 डिसेंबर 2022 पर्यंत दिली होती. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला असून, पात्र उमेदवारांना 28 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

एकूण जागा – 1400

पदाचे नाव – अग्निवीर (SSR) 01/2023

शैक्षणिक पात्रता

संबंधित पदानुसार किमान बारावीपर्यंत शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक
मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असावं.
उमेदवारांनी मॅथ्स, फिजिक्स आणि केमेस्ट्री किंवा बायोलॉजीमधून शिक्षण पूर्ण केलेलं असावं
शारीरिक क्षमताही पूर्ण करणे आवश्यक आहे.

अशी होणार भरती

बारावी गुणांच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग
लेखी परीक्षा
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), आणि भौतिक मापन चाचणी (PMT)
दस्ताऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2022

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -