Monday, February 24, 2025
Homeब्रेकिंगनरेंद्र मोदी हेच नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत; अमृता फडणवीस यांचे विधान

नरेंद्र मोदी हेच नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत; अमृता फडणवीस यांचे विधान

राज्याचे भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच काहींना काही कारणांनी चर्चेत असतात. शिवाय त्या राजकीय प्रतिक्रियाही देत असतात. त्यांच्या या प्रतिक्रियांमुळे विरोधकही अनेकदा आक्रमक होताना दिसतात. नागपूर येथे काल त्यांनी असेच एक वक्तव्य केले. भारताचे एकूण दोन राष्ट्रपिता आहेत. एक म्हणजे महात्मा गांधी आणि दुसरे नवीन भारताचे राष्ट्रपिता हे नरेंद्र मोदी आहेत, असे फडणवीस यांनी म्हंटले.

नागपूरमध्ये आयोजित अभिरुप न्यायालयच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक विधान केले. यावेळी पुढे त्या म्हणाल्या की, “मी राजकारणात फार पडत नाही. मी माझे विचार मांडत असते. ट्विटरचा वापर फार करत नाही. पण वेळ मिळाला तेव्हा माझं ट्विटर अकाउंट मी वापरते. माझ्याकडे कोणी ट्विटरर नाही. मी जास्त पॉलिटिकल बोलत नाही. मला वाटलं तरच बोलते. जास्त पॉलिटकल बोलू नये हाच माझा प्रयत्न असतो. त्यामुळे माझं आणि देवेंद्रजींचे नुकसान होते. लोक म्हणतात देवेंद्रजी माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन बोलतात. मात्र ते खरं नाही. मला वाटत तेच मी बोलते.

अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा कमाईचा मुद्दा उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा माझी कमाई अधिक आहे. मात्र, सामाजिक कार्य हीच देवेंद्रजींची कमाई आहे. मी आधी लाजरी बुजरी होती हे खरं आहे. मी लहान पणापासून टॉमबॉय टाईप होते. माझं लग्न होऊन मी देवेंद्रजींकडे गेले तेव्हा त्यांच्या घरी ते राजकारणात असल्याने ओपन हाऊसप्रमाणे राहायचे. कार्यकर्ते सरळ घरात यायचे. बेड रूमपर्यंत जायचे. मग मला त्यात सुधार करावा लागला, असे अमृता फडणवीस यांनी म्हंटले.

गाणे गाणं ही माझी लहानपणापासूनची आवड आहे. मी गायिका होईल हा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझे पती मुख्यमंत्री बनतील आणि मला मुंबईला यावं लागेल असंही वाटलं नव्हतं. गाणं गाताना तुमचे कोस्टार जर साक्षात अमिताभ बच्चन असतील तर तुम्ही घरी बसणार का? असा सवाल करतानाच मी गाणी म्हटली. पण पतीच्या पोझिशनचा फायदा उचलला नाही, असे अमृता फडणवीस यांनी म्हंटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -