Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रसीमावादात महाराष्ट्राचा अपमान खपवुन घेणार नाही, पंतप्रधानाकडे जाणार : राधाकृष्ण विखे- पाटील

सीमावादात महाराष्ट्राचा अपमान खपवुन घेणार नाही, पंतप्रधानाकडे जाणार : राधाकृष्ण विखे- पाटील

महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत आम्ही पंतप्रधानंकडे घेवून जाणार आहोत. आता महाराष्ट्रचा अपमान खपवुन घेणार नाही, असे विधान महसुल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी साता-यात केले आहे. पुसेगाव (ता. खटाव) येथील सेवागिरी रथोत्सवास मंत्री विखे- पाटील आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर महसुलमंत्री राधाकृष्ण विखें यांनी वक्तव्य केल आहे. ते म्हणाले, अमित शहांनी समज देवुन सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे महाराष्ट्र राज्याबाबत बोलत आहेत. आमच्या राज्याविषयी बोलताना मुक्ताफळं उधळत आहेत, अशी विधानं आम्ही खपवून घेणार नाही.

सीमाप्रश्नात महाराष्ट्राच्या हिताला बाधा येवू देणार नाही. तसंच सीमावासीयांच्या पाठीशी आम्ही कायम उभे राहणार आहोत. कोर्टात राज्याची बाजू मांडण्यासाठी चांगला वकील सुद्धा दिलेला आहे. मात्र अमित शहा यांनी मध्यस्ती करुन समज देवुन सुद्धा जर कर्नाटकाचे मुख्यमंत्री ऐकत नाहीत. त्यामुळे आता हा प्रश्न आम्ही पंतप्रधानांच्याकडे घेवुन जाणार आहोत. यापुढे महाराष्ट्रचा अपमान आम्ही खपवुन घेणार नसल्याचं सुद्धा राधाकृष्ण विखे- पाटील यांनी साता-यात सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -