Monday, December 23, 2024
Homeक्रीडाआयपीएल-2023 ची तारीख ठरली, यंदा आठवडाभर उशिरा सुरु होणार स्पर्धा..

आयपीएल-2023 ची तारीख ठरली, यंदा आठवडाभर उशिरा सुरु होणार स्पर्धा..

‘इंडियन प्रीमिअर लीग’ अर्थात आयपीएल-2023 साठी शुक्रवारी (ता. 23) कोची येथे ‘मिनी ऑक्शन’ होणार आहे. मात्र, त्याआधीच यंदाच्या ‘आयपीएल’ची तारीख समोर आलीय. यंदा 1 एप्रिल 2023 पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

महिला आयपीएलमुळे उशीर

दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल सुरु होते. मात्र, यंदा 3 ते 26 मार्चदरम्यान महिला आयपीएल होणार आहे. त्यामुळे पुरुष आयपीएल आठवडाभर उशिराने सुरु होणार असल्याचे समजते.

तत्पूर्वी कोची येथे मिनी ऑक्शनमध्ये 369 खेळाडूंवर बोली लागणार होती. मात्र, फ्रँचायाझींनी अतिरिक्त 36 खेळाडूंची नावं सुचवल्याने खेळाडूंची संख्या 405 वर गेली. त्यात 273 भारतीय, तर 132 परदेशी खेळाडू असून, पैकी फक्त 87 खेळाडूंनाच संधी मिळेल.

आयपीएल फ्रँचायझींनी लिलावात आतापर्यंत 743.5 कोटी रुपये खर्च केले आहेत. 23 डिसेंबरला 87 खेळाडूंसाठी 206.5 कोटी रुपये खर्च करता येणार आहेत. कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -